सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून अर्थ क्षेत्रात आम्ही पाऊल टाकले. सदैव आमचे प्रयत्न असतात की, आमच्याशी जोडले जाणारे ग्राहक, सभासदांचा नेहमी हिताचा विचार करणे, आणि प्रत्यक्षात त्या गोष्टींचा अवलंब करणे. त्यांच्या कष्टाची जाण ठेवून त्यांच्या प्रत्येक स्वप्नांना तडीस घेऊन जाणे हे आमचे उत्तर दायित्व.. त्यांच्या अडी-अडचणीस त्यांच्या पाठीशी एक सच्चा मित्र म्हणून उभे रहाणे.. त्यांच्या विश्वासाचे संगोपण, संरक्षण करणे ही देवगिरी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. ची मोलाची जबाबदारी...
ग्राहक, सभासदांच्या विश्वासाला अर्थात जीवनपुंजीला सर्वोपरी परतावा देणे हा आमचा सर्वांगीन ध्यास असणार. तसेच आधुनिक तंत्राला हाताशी धरुन त्यांना जलद आणि सोयिस्करपणे सेवा देऊन त्याच्या ध्येयवादी स्वप्नांची पुर्तता करण्यास सहाय्य करुन त्यांचे भविष्य सुकर करणे..
आम्हाला विश्वास आहे की, तुमचा विश्वास आणि आमचे योगदान आमच्या बद्दल तुमच्या मनात मानाचे स्थान निर्माण करेल. तसेच आपल्या मोलाच्या साथीने आपण आणि देवगिरी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. जीवनात एक-एक पाऊल सोबत टाकत यशाची अनेक शिखरे गाठू... आपले जीवा-भावाचे नाते घट्ट करु....
संस्थेच्या प्रयत्नांना आधुनिक तंत्राचा तसेच बदलत्या जागतिक डिजिटलाझेशनची जोड देऊन संस्थेच्या खातेदारांना जलद आणि सोयीस्कर सेवा देणे हा आमचा प्रयत्न आहे... आणि तो प्रयत्न अमलातही आणला जात आहे...
खातेदारांचे मैत्रीपूर्ण संबंधाचे संवर्धन करणे तसेच त्यांच्या विश्वासाला अनमोल रुपाने जपणे हे आमचे प्रथम कार्य असेल... तसेच छोट्या मोठ्या उद्योजकांना कर्जाच्या रुपाने सहकार्य करुन त्याच्या व्यवसायाला जोमाने पुढे घेऊन जाणे आणि त्यांना परिपूर्णरित्या भक्कम बनविणे हे आमचे मोलाचे कार्य.. तसेच जिल्ह्यातच नव्हेतर राज्यातही संस्थेच्या शाखेंचा विस्तार करुन स्थानिक उद्योजकांचे स्वप्न साकार करणे... आणि पुढील काही वर्षात एक हजार कोटींचे उद्दीष्ट साकार करणे.. तसेच खातेदार, सभासद, अधिकारी, कर्मचारी वृंद व हितचिंकांच्या विश्वासाला सर्वोच्च शिखरावर घेऊन जाणे हा आमचा दृष्टीकोन असेल....
नागरिकांना आपल्या पारिवारीक तसेच व्यवसायिक नैतिक जबाबदारीची जाण करुन देवून त्या ध्येयवादी तत्वांना सत्यात साकार करणे.. आणि त्यांना व्यवसायिकतेतून आर्थिक संपन्नतेच्या रुपाने समाज व्यवस्थेत मानाचे स्थान देणे.. आणि समाजप्रणाली अर्थ संपन्न बनवून विकास पथावर घेऊन जाणे हा आमचा यथासांग प्रयत्न आहे आणि हाच आमच्या संस्थेच्या मोलाचा मिशनचा भाग असणार आहे....